नळदुर्ग / प्रतिनिधी-

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अशोक जगदाळे यांच्या वतीने  मुलतान मोहल्ला येथील मस्जिद अबुल हसनात येथे 14 एप्रिल रोजी इफ्तार आयोजन करण्यात आले होते. यावेळी  अशोक जगदाळे यांचा इब्राहिम शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 त्यानंतर  अशोक जगदाळे यांच्या हस्ते मस्जिदचे पेश इमाम  हाफेज आली सौदागर, सिद्दीक शेख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अशोक जगदाळे यांनी मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान सणाच्या शुभेच्छा दिल्या. या इफ्तार पार्टीला माजी नगरसेवक शरीफ शेख, नितीन कासार, शब्बीर कुरेशी, अमृत पुदाले, कमलाकर चव्हाण, सरदार सिंग ठाकूर, अख्तर काजी, रुकनोद्दीन शेख , मन्सूर शेख, अलीम शेख, शिवाजीराव वऱ्हाडे, रहेमान कुरेशी, सुधाकर चव्हाण, ताजोद्दीन सय्यद, दीपक काशीद, शिवाजी गायकवाड, सलमान काजी, रिजवान काजी, धनाजी गायकवाड, इरफान जागीरदार, सतीश मोटे, अफसर जमादार, अमित शेंडगे, प्रवीण चव्हाण, सुजित बिराजदार, सचिन भोई, मुर्तुजा शेख यांच्यासह इत्यादी जण उपस्थित होते. ही इफ्तार पार्टी यशस्वी करण्याकरिता सलीम शेख, शमा काझी, अतिक शेख, रशीद शेख, शफी शेख यांनी परिश्रम घेतले.


 
Top