तेर  / प्रतिनिधी-

धाराशिव तालुक्यातील तेर येथे ४६ लाख निधीद्वारे विकासकामांच्या माध्यमातून महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना.  धाराशिव तालुक्यातील तेर येथे जयंतीचे औचित्य साधून भीमनगर, साठेनगर येथे विकासकामांचे भूमिपूजन जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

निळा झेंडा चौक, भीमनगर येथे आ.राणाजगजितसिंह पाटील  यांच्या आमदार निधीतून रु.१० लाखाचे सभागृह भूमिपूजन तसेच शासनाच्या विविध योजनांतून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथे सामाजिक भवन बांधणे रु.२० लाख, मातंग समाजातील स्मशानभुमित जाण्यासाठीचा सिमेंट रस्ता रु.०५ लाख, स्मशानभूमी संरक्षण भिंत रु.०६ लाख, दहन शेड रु.०५ लाख आदी कामांचे भूमिपूजन जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सरपंच दिदि काळे उपसरपंच श्रीमंत फंड, विलास रसाळ,प्रजोत रसाळ, ईश्वर साळुंके,माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी, भास्कर माळी, जुनेद मोमीन, नारायण साळुंके, राहूल गायकवाड, लतिका पेठे, अजित कदम, नवनाथ पसारे व नागरिक उपस्थित होते.


 
Top