परंडा / प्रतिनिधी -

तालुक्यातील खासापूरी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेरमन पदी महाविकास आघाडीचे दिपक तनपुरे तर उपचेअरमनपदी हंसराज घाडगे यांची निवड करण्यात आली. सदर निवड ठाकरे गटाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, माजी आमदार राहुल मोटे यांच्या मार्ग दर्शनाखाली झाल्या मुळे तालुक्यात महाविकास आघाडी चे वर्चस्व राहिले आहे अघाडीचे १३ उमेदवार  बिनविरोध निवड दि.२० मार्च रोजी करण्यात आली होते.चेरअम व व्हाईस चेअरमन निवडीसाठी दिनांक १३ एप्रिल रोजी सहायक निबंधक कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते या निवडीच्या वेळी चेरमन पदासाठी दिपक तात्या साहेब तनपुरे व कल्याण बलभीम किलचे व व्हाईस चेरमन पदासाठी हंसराज वसंत घाडगे व सोनाली गाडे असे प्रत्येकी दोन नामनिर्देशक अर्ज दाखल केल्याने मतदान घेण्यात आले या चुरशीच्या निवडणुकीत दिपक तात्या साहेब तनपुरे चेरमन पदासाठी ७ मते मिळवुन विजयी झाले तर व्हाईस चेरमन पदासाठी हंसराज घाडगे यांना ही ७ मते मिळवुन विजयी झाले व प्रातिस्पर्धे यांना ६ मते मिळाली या निवणुक प्रकिये वेळी तालुका सहकारी निवडणुक अधिकारी एस पी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुक अधिकारी पी पी चंदने यांनी काम पाहिले.नूतन पदाधिकारी यांची कार्यकत्यांच्या वतीने सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

 
Top