वाशी/ प्रतिनिधी-

महाडीबीटी ऑनलाईन डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजने अंतर्गत अनु. जाती लाभार्थीस कमीत कमी क्षेत्र 00 हे. 40 आर व जास्तीत जास्त 15 एकर जमीन असणारे लाभार्थीस नवीन विहीरीसाठी रु.2,50,000/- रुपये विद्युत पंप, 20,000/- रुपये वीजजोडणी 10,000/- रुपये इत्यादी लाभ दिला जातो.दि. 14/04/2023 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणेसाठी एक आगळी वेगळी जयंती साजरी करणेसाठी मा. कृषि विकास अधिकारी जि. प. उस्मानाबाद यांचे संदेशानुसार योजना प्राप्त लाभार्थी श्रीमती अहिल्या काशीनाथ घोडके रा. पारडी ता. वाशी यांचे विहीरीवर जाऊन त्या ठिकाणी जयंती साजरी करण्याचे नियोजन करण्यात आले, कोणत्याही प्रकारे खर्च न करता साध्या पध्दतीने मा. कृषि विकास अधिकारी श्री. प्रमोद राठोड यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करुन जयंती साजरी करण्यात आली. त्यानंतर लाभार्थीस मार्गदर्शन करणे, पांरपारिक पीक पध्दती बदलून फळबाग व आंतरपीक भाजीपाला आणि इतर पीकपध्दतीचा अवलंब करणेबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास ग्रामपंचायत पार्डी येथील उपसरपंच उमेश चौधरी, माजी सरपंच बबन चौधरी, पोलीस पाटील विनोद क्षीरसागर, इतर लाभार्थी व शेतकरी उपस्थीत होते सदर कार्यक्रमांस श्री. राठोड बी. ए. कृषि अधिकारी, श्री. माळी वि. अ. (कृषि) पंचायत समिती वाशी / भूम इत्यादी अधिकारी / कर्मचारी उपस्थीत होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. दिलीप (दादा) गरड सरमकुंडी (वाशी) लाभधारक यांनी केले.

 
Top