धाराशिव / प्रतिनिधी-

जिल्हा परिषद उस्मानाबाद अंतर्गत विविध विभाग तसेच तालूकास्तरावर पंचायत समिती व  त्यांचे अधिनस्त कार्यालयामार्फत दि.21 एप्रिल,2023 ते दि.21 मे 2023 या कालावधीत झीरो पेन्डन्सी अभियान राबवण्यात येत आहे. याची सुरुवात दि.21 एप्रिल 2023 राष्ट्रीय नागरी सेवा दिनापासून करण्यात आले आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या आस्थापनाविषयक बाबी अद्यावत करणे,कर्मचाऱ्यांना विविध वैयक्तिक लाभ मंजूर करणे तसेच शासनस्तर,विभागीय आयुक्त स्तरावरील प्रलंबित संदर्भ,कार्यालय स्तर प्रलंबित निवेदन /तक्रारी निकाली काढणेचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे.सदर अभियान कालावधीत निकाली काढलेल्या व प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा साप्ताहीक आढावा घेण्यात येणार आहे.त्यासाठी 2 तालूक्यासाठी एक अधिकारी या प्रमाणे पालक अधिकारी यांची नियुक्ती करुन त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहवाल सादर करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतरही सदरचे अभियानात सातत्य ठेवून प्रलंबित संदर्भ विहित कालावधीत निकाली काढण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे.असे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी कळविले आहे.

 
Top