वाशी / प्रतिनिधी-

पारगाव  व परिसरातील शेतकऱ्यांनी आरोग्य मंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांच्याकडे मांजरा नदीला पाणी सोडण्याची मागणी केली होती. आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेब यांनी तात्काळ या मागणीची दखल घेऊन मांजरा नदीला पाणी सोडण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले होते. 

आदेश दिल्यापासून दहा दिवसांमध्ये चार बंधारे पाण्याने फुल भरून पार करून पाणी पुढे वाहत आहे.वाशी तालुक्यातील पारगाव येथून वाहणाऱ्या मांजरा नदीमध्ये संगमेश्वर प्रकल्प इट येथून पाणी सोडण्यात आले आहे. गिरवली,मानेवाडी, जाणकापूर,पारगाव हे चार बंधारे पाण्याने फुल भरले असून या पाण्याचे पूजन पारगाव व परिसरातील शेतकऱ्यांच्या हाताने करण्यात आले.

यावेळी पाणी पूजन कार्यक्रमाला उपस्थित शिवसेनेचे उप तालुका प्रमुख विकास तळेकर, सरपंच महेश कोळी, सरपंच बंटी लाखे, धनंजय मोटे, समाधान मोटे, श्रीराम आखाडे, राजा कोळी, तानाजी कोकाटे, किशोर आखाडे, सुशांत कोकणे, मुजमिल पठाण,चेतन तातुडे, बाप्पा गावडे, सलीम शेख, संभाजी मोरे, संदीप लाखे, संदीप थिटे,तसेच संबंधित विभागाचे अधिकारी हुलसुरे उपविभागीय अभियंता,तांबे सहाय्यक अभियंता,निकिता तटगमवार सहायक अभियंता, संतोष जोगदंड कालवा निरीक्षक, माळी साहेब कालवा निरीक्षक, आदी पदाधिकारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थित शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे लाडके आरोग्य मंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांचे आभार मानले.


 
Top