नळदुर्ग / प्रतिनिधी-

 नळदुर्ग येथे दि.३ एप्रिल रोजी जैन समाज बांधवांच्या वतीने भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली. यावेळी बसस्टँड ते भगवान महावीर चौकापर्यंत भव्य शोभा यात्रा काढण्यात आली होती.

  सालाबादप्रमाणे याहीवर्षी दि.३ एप्रिल रोजी नळदुर्ग येथे जैन समाज बांधवांच्या वतीने भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी सकाळी १० वा. भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त बसस्टँड ते भगवान महावीर चौकापर्यंत वाजत गाजत भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. शोभा यात्रा शांततेत पार पडण्यासाठी जैन युवा मंचचे अध्यक्ष केवल पाटील, उपाध्यक्ष अभिजित पाटील, सरचिटणीस सोहम कासार, अजित पाटील, प्रतीक पाटील, सुरज आवटे,पारस पाटील, अक्षय आवटे, सुमित यादगिरे, सुरज पाटील अभिषेक आवटे व जैन युवा मंचच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

        शोभा यात्रा भगवान महावीर चौकात शोभायात्रेचे विसर्जन करण्यात आले. यानंतर जैन समाज मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील, उपाध्यक्ष प्रविण कासार, माजी नगराध्यक्ष नितीन कासार यांच्या हस्ते भगवान महावीर चौकाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. श्री इंद्रजीत पाटील, श्रेयांश पाटील, वजरकांत शेटगार यांच्या हस्ते भगवंतांना अभिषेक करण्यात आला. यावेळी भगवान महावीर यांचे माता पिता होण्याचा मान श्री व सौ. श्रुती सुमित यादगिरे यांना मिळाला.


 
Top