कळंब / प्रतिनिधी-

 स्त्री शक्तीचा सदैव गौरव करणा-या भारतीय संस्कृतीला सर्व जगात तोड नाही. त्यामुळे स्त्री जन्माचे स्वागत करा , कारण कर्तबगार मुलगी सासर, माहेर दोन्ही कुटुंबाचा नावलौकिक वाढवित असते, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी केले.

 तालुक्यातील सौंदणा (अंबा) या ठिकाणी गुरुवारी (दि.२७) हा सत्कारसोहळा झाला. गावातील अ‍ॅड अनुश्री सूरज गायकवाड यांची दिवाणी न्यायाधिश व न्याय दंडाधिकारी वर्ग-एक या पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांच्या सन्मानार्थ हभप दिनकर बाबा नायगावकर यांचे किर्तन आयोजित करण्यात आले . यावेळी कळंबच्या उप विभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी अहिल्या गाठाळ म्हणाल्या, गेल्या तीन वर्षात कोविड व ओला दुष्काळ यामुळे अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. विशेषतः अतिवृष्टी झाली तेव्हा सौंदणा परिसरातील अनुभव अविस्मरणीय राहिला आहे. गायकवाड परिवाराशी असलेल्या ऋणानुबंधाबद्दल त्यांनी गौरवपूर्व उल्लेख केला.

 
Top