धाराशिव / प्रतिनिधी-

   मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सव समितीच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या सतरा तारखेला हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा उपक्रम करण्यात येत आहे. 

   स्वातंत्र्यसैनिक भास्करराव नायगावकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सव समितीचे जिल्हा संयोजक युवराज नळे यांनी त्यांचे स्वागत करुन मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सव समिती तर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची त्यांना माहिती  देऊन आपल्यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांनी या स्वातंत्र्य संग्रामात दिलेल्या योगदानाचे विस्मरण होऊ दिले जाणार नाही असे सांगितले.

   या प्रसंगी मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सव समितीचे राजेंद्र अत्रे, रविंद्र शिंदे, मदन पवार, शशिकांत सुर्यवंशी, संजय नायगावकर, शीला उंबरे, बालाजी जाधव, प्रवीण जगताप, राजेश परदेशी, गणेश वाघमारे, महेंद्र बिदरकर, बाबासाहेब गुळीग, लक्ष्मण माने, सुशील कुलकर्णी, पुष्पकांत माळाळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top