धाराशिव / प्रतिनिधी-

 येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या महिला वस्तीगृहाच्या अधीक्षक या महिला असून त्यांना महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या प्रोत्सानामुळे चालक सुनीता पाटील व तिचा पती रविराज पाटील व मुलगा तसेच इतरांकडून रात्री अपरात्री धमकावण्याचे व सतत मानसिक त्रास देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे याप्रकरणी समिती नेमून अधिष्ठाता यांच्यासह मेस चालक यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी महिला वस्तीगृहाच्या अधीक्षिका एस.एस. भोसले यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांकडे एका निवेदनाद्वारे दि.१७ एप्रिल रोजी केली आहे.

याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी. तसेच संबंधित अत्याचारित व्यक्तींना न्याय द्यावा. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ यांनी दिला आहे.



 
Top