धाराशिव / प्रतिनिधी-

 क्रांतीसुर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती शिंगोली आश्रम शाळेत उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे  अध्यक्ष सुर्यकांत बडदापुरे , कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिदे कुमंत व मुख्याध्याप चित्तरंजन राठोड, पर्यवेक्षक शेख अब्बास अली यांनी प्रतिमेचे पूजन केले . 

कार्यक्रमाचे अध्यक्ष बडदापुरे यांनी  महात्मा बसवेश्वर यांचे विचार सर्वांनीच डोळ्या समोर ठेवून देशासाठी कार्य केले पाहिजे असे आव्हान त्यांनी केले . कार्यक्रमासाठी पाटील रत्नाकर, पडवळ खंडू , दिपक खबोले , कैलाश शानिमे, विशाल राठोड, सुधीर कांबळे, संतोष पालम पल्ले, मदनकुमार आमदापुरे, सचीन राठोड, सतीश कुंभार इत्यादी शिक्षक व कर्मचारी गोविंद बनसोडे, अमोल जगताप, बबन चव्हाण, रेवा चव्हाण, मस्के मामा इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता तोगरगे मॅडम यांनी केले व आभार   सुरेखा कांबळे मॅडम यांनी मानले.

 
Top