धाराशिव / प्रतिनिधी-
पृथ्वीवरील हवा, पाणी, खनिजसंपत्ती, भूमी आणि जंगले या साधनसंपत्तीचा अनियंत्रित वापर झाल्याने निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. त्यामुळे निसर्गाच्या समतोलासाठी वसुंधरा संवर्धन आणि विकासासाठी महिलांनीच पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. एस बी गायकवाड यांनी येथे केले.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो सोलापूर आणि ग्रामपंचायत कावळेवाडी ता व जि उस्मानाबाद तसेच भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वसुंधरा दिवसाच्या निमित्ताने ग्रामस्थांसाठी आयोजित केलेल्या लोकसंवाद कार्यक्रमात डॉ. एस बी गायकवाड बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सरपंच अजित खोत, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, भुवैज्ञानिक स्नेहल कांबळे, आणि ग्रामपंचायत सदस्य धनराज मेकिले आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. गायकवाड म्हणाले, भूगर्भातील पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा केल्याने पुढील काळात मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण होणार आहे. यासाठी आतापासूनच काटकसरीने पाणी वापराचे व्यवस्थापन केले पाहिजे. पिण्यासाठी व वापरासाठी पाणी जपून वापरले पाहिजे. किमान प्रत्येकाने एक तरी रेन वॉटर हार्वेस्टिंगचे मॉडेल तयार केले पाहिजे. सध्या येणाऱ्या मान्सूनमध्ये पावसाचे पाणी अडवून जास्तीत जास्त पाणी जमीनीत मुरवले पाहिजे जेणेकरून निसर्गाचे संवर्धन होईल.
श्रीमती कांबळे म्हणाल्या, या केंद्र शासनाच्या अटल भूजल योजनेत उस्मानाबद जिल्ह्यात ५५ गावांचा समावेश करण्यात आले आहे. त्यामध्ये कावळेवाडी गावं देखील समाविष्ठ आहे. शेतकरी बांधवानी शेतामध्ये ठिबक व तुषार सिंचनाचा मोठ्या प्रमाणात अवलंब करावे ज्यामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात बचत होईल आणि भूजल पातळी देखील टिकून राहील.
श्री चव्हाण म्हणाले, जागतिक वसुंधरा दिनाचा यावेळचा विषय आमच्या गृहात गुंतवणूक करा असा आहे. पृथ्वीवरील ऱ्हास होत असलेली जंगले, खनिज संपत्ती, हवा, पाणी यांचे संवर्धन करणे म्हणजेच गुंतवणूक केल्यासारखे आहे. तसेच भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत असल्याने पाणी जपून वापरले पाहिजे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
श्री अजित खोत यांनी गावात सुरु असलेल्या जलसंधारणाच्या कामांची माहिती दिली. लोकसहभागातून पाणीदार गावं बनवण्याचा संकल्प यावेळी त्यांनी केला. श्री विश्वनाथ खोत यांनी मराठवाड्यातील पाण्याची समस्या आणि लोकसहभाग याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी लातूर येथील मुक्ताई बहुदेशीय सेवाभावी संस्थेच्या कलाकारांनी पथनाट्याच्या माध्यमातून प्लास्टिक वापर, पाणी बचत आणि पर्यावरणाचे संवर्धन विषयी सादरीकरन केल कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अंबादास यादव यांनी केले. यावेळी घेण्यात आलेल्या
प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे- जालींदर गुलाब कावळे, सोनाली महादेव कोळी, मानसी महादेव कोळी, राजेंद्र सोमनाथ कोळी चित्रकला स्पर्धेतील नावे- मानसी नवनाथ कावळे, अनुजा छात्रभूज गडकर, प्रविण शरद केंद्रे. रांगोळी स्पर्धेतील विजेते- ईश्वरी विष्णू जाधव, प्रगती प्रकाश कावळे, स्नेहल मनोज खोत आदि.