धाराशिव / प्रतिनिधी-
सालाबाद प्रमाणे याही वर्षी महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली. मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, तहसीलदार शिवानंद बिडवे,नायब तहसिलदार मुगावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरकारखान्याचे उपाध्यक्ष हनुमंत भुसारे, धनंजय शिंगाडे, चर्मकार महासंघाचे प्रदेश अध्यक्ष नितिन शेरखाने,माजी नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे,, धनंजय राऊत,डॉ. चंद्रजित जाधव, संजय मुंडे, बाळासाहेब मुंडे,हनुमंत भुसारे,मेसा जानराव,गणपती कांबळे, यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.
या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीरशैव जंगम मठ ट्रस्ट धाराशिव अध्यक्ष शिवानंद कथले यांनी केले. आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष वैजिनाथ गुळवे यांनी केले.अशोक पाळणे,दिलीप गुळवे,भाऊसाहेब बेलुरे,अर्जुन साखरे,राहुल लोखंडे,शिवलिंग गुळवे,केदार गुळवे,आदी सह वीरशैव जंगम मठ ट्रस्ट व लिंगायत संघर्ष समिती चे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी सर्व प्रमुख पाहुणे व समाज बाधवांना महात्मा बसवेश्वर यांचे जीवनचरित्र व सामाजिक कार्य यांचे ग्रंथ भेट म्हणुन देण्यात आले. सर्व प्रमुख पाहुणे यांनी महात्मा बसवेश्वर यांचे समता वादी विचार जीवनामध्ये प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.