धाराशिव / प्रतिनिधी- 

प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसा निमित्त शिराढोण चे नितीन पाटील यांनी स्वखर्चातून 11 फुट उंचीचा व  5,51,000 रुपये खर्च करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा  शिराढोण करांना धम्मदान केली. राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी शिवजलक्रांतीच्या माध्यमातून राज्यामध्ये जलक्रांतीचा नवा पॅटर्न अस्तित्वात आणलेला आहे. आरोग्य विभागाच्या माध्यमातून गावोगावी कायमस्वरूपी आरोग्य यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी आलेल्या प्रत्येक प्रस्तावाला न्याय देण्याचे काम देखील त्यांच्याकडून सध्या सुरू आहे. 

 बळीराजासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना देखील आर्थिक पाठबळ देण्याचा दानशूरपणा जिल्हावाशीयांनी अनुभवलेला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिरढोण येथील नितीन पाटील यांनी स्वखर्चातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला एका कार्यक्रमांमध्ये पुतळ्याचे अनावरण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या हस्ते  करण्यात आले.

 यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद वाघमारे, विधानसभा संघटक अमोल पाटील, तालुकाप्रमुख लक्ष्मण हुलजुते कळंब माजी नगराध्यक्ष सागर मुंडे, संजय मुंदडा, अमर वाघमारे, सुधीर भवर, युवासेना तालुकाप्रमुख ईश्वर शिंदे, ॲड. मंदार मुळीक, सुहास बारकुल व शिवसैनिक व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थिती होती

 
Top