भीमजी अ‍ॅटोरिक्षा युनियनचा पुढाकार

धाराशिव / प्रतिनिधी- 

 महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गुरूवारी भीमजी अ‍ॅटोरिक्षा युनियनच्यावतीने शहरातून अ‍ॅटोरिक्षा रॅली काढून डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

अ‍ॅटोरिक्षा रॅलीचा शुभारंभ मध्यवर्ती बसस्थानक येथून झाला. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, वंचित बहुजन आघाडीचे भैय्यासाहेब नागटिळक, गोपी बनसोडे, मयूर बनसोडे, मृत्यूंजय बनसोडे यांच्या उपस्थितीत रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. ही रॅली बसस्थानकातून सुरू होवून छत्रपती शिवाजी महाराज चौक, देशपांडे स्टॅन्ड, आझाद चौक, काळा मारूती, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तांबरी विभाग, बार्शी नाका जिजाऊ चौक, महात्मा बसवेश्वर चौक, राजर्षी शाहू महाराज चौक, वस्ताद लहूजी साळवे चौक, महात्मा ज्योतीबा फुले चौक ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या रॅलीचा समारोप करण्यात आला.

यावेळी युनियनचे मार्गदर्शक सिध्दार्थ बनसोडे, राणा बनसोडे यांच्यासह अध्यक्ष रोहित बनसोडे, उपाध्यक्ष आकाश बनसोडे, सचिव अरबाज सय्यद, सहसचिव चंद्रकांत कांबळे, अमर शिंदे, समाधान वाघमारे, दत्ता शेवाळे, सुनील गायकवाड, नंदू सोनवणे, सौरभ वाघमारे, अभिजीत शिंगाडे, विकी माने, धनंजय रणखांब आदींनी रॅलीसाठी परिश्रम घेतले.

 रिक्षांची आकर्षक सजावट

या रॅलीमध्ये अ‍ॅटोरिक्षामध्ये तथागत गौतम बुध्द यांच्या मूर्तीसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची निळ्या ध्वजाने आकर्षक सजावट करण्यात आली होती. शहरातील विविध चौकांमध्ये फुले-शाहू-आंबेडकर यांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. या रॅलीत शहर व परिसरातील जवळपास दीडशे रिक्षाचालक आपापला रिक्षा घेवून सहभागी झाले होते.


 
Top