परंडा/ प्रतिनिधी-

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस मा. आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी संपर्क कार्यालय, परंडा येथे दि. ३० मार्च २०२३ रोजी भारतीय जनता पार्टीचे परंडा तालुक्यातील सर्व पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बुथ प्रमुख व कार्यकर्ते यांची आढावा बैठक घेऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

सध्या परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे त्या अनुषंगाने या बैठकीत परंडा कृषी उत्पन्न बाजार समिती सन २०२३ च्या निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचेही यावेळी मा. आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी सांगितले.

याबैठकीच्या सुरवातीला पुण्याचे दिवंगत खासदार गिरीशजी बापट यांना श्रध्दांजली अर्पण केली.

 यावेळी परंडा न.प. चे गटनेते सुबोधसिंह ठाकूर,  जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे, जिल्हा चिटणीस विकास कुलकर्णी, तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, तालुका सरचिटणीस विठ्ठल तिपाले, तानाजी पाटील तसेच सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top