धाराशिव / प्रतिनिधी- :-

 सध्या धाराशिव  जिल्ह्यात भ्रष्टाचार प्रकरणी लाच खोरावर लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या वतीने धडाकेबाज कामगिरी होत असुन सहायक नगर रचनाकार मयुरेश केंद्रे यांनी मौजे सिंदफळ ता.तुळजापुर येथील अकृषी जमीन संदर्भात सहा लाखांची लाच मागितली असता महेंद्र धुरगुडे यांनी सदर लाच लुचपत प्रतिबंध विभागाशी संपर्क साधुन संबंधित अधिकारी यांच्या वरती कारवाई केली.

राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी भ्रष्टाचारविरोधी केलेल्या कार्याबद्दल फोरम ऑफ सिटीझन (फुक) संघटनेच्या वतीने महेंद्र धुरगुडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.भ्रष्टाराचा विळखा इतका पसरला आहे की एखाद्या कागदावर सही घेण्यासाठी लाचेची चिरीमिरी दिल्याशिवाय कागद मिळत नाही,भ्रष्टाचार विरोधी फुक संघटनेने सदैव आवाज उठविला आहे.मान्यवरांनी आपापल्या मनोगतातुन भ्रष्टाचारावर मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमात प्रामुख्याने डॉ रमेश दापके देशमुख,सचिव धर्मवीर कदम,अब्दुल लतिफ,गणेश रानबा वाघमारे,राजाभाऊ माळी,रंगनाथ भोसले,रमेश बाराते, राहुल कदम अन्य इतर उपस्थित होते.कार्यक्रमांचे सुत्रसंचलन राजाभाऊ माळी यांनी केले तर आभार धर्मवीर कदम यांनी मानले.


 
Top