तुळजापूर / प्रतिनिधी-

 नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 3 तुळजापूर(खुर्द) शाळेतील सहशिक्षिका श्रीम.नीता भाऊराव गायकवाड यांचा वयोमानानुसार आज सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सत्कार नगर पालिका,तुळजापूर चे मुख्याधिकारी श्री. अरविंद नातू साहेब यांच्या शुभहस्ते शाल, साडी, पुष्पगुच्छ व श्री. पंडितराव जगदाळे यांनी भेट दिलेल्या "श्री विठ्ठलाची प्रतिमा" देऊन   सहकुटुंब सत्कार करण्यात आला. 

  कार्यतत्पर मुख्याधिकारी श्री. अरविंद नातू यांनी  भविष्य निर्वाह निधीचा धनादेश ही नगर पालिका शिक्षण विभाग,तुळजापूरच्या  वतीने श्रीम.नीता गायकवाड यांना दिला. सत्काराला उत्तर देताना श्रीम.निता गायकवाड यांनी महाराष्ट्रभर नावाजलेल्या नगर परिषद शाळा क्रमांक 3 तुळजापूर (खुर्द) च्या शाळेत मला सेवा करण्याची संधी मिळाली याबद्दल आनंद  व्यक्त केला.

        सेवानिवृत्ती पर सत्काराच्या कार्यक्रमाला नगर पालिकेचे माजी नगरसेवक श्री.पंडितराव जगदाळे, नगर परिषद,तुळजापूर कार्यालयीन अधीक्षक  वैभव पाठक, शिक्षण विभाग दत्तात्रय डोंगरे, शिक्षक पालक संघाचे माजी उपाध्यक्ष  रणजित भोजने,नगर परिषद शाळा क्रमांक 3,तुळजापूर चे मुख्याध्यापक तुकाराम मोटे ,नगर परिषद शाळा क्रमांक 2 चे मुख्याध्यापक   गणेश रोचकरी, नगर परिषद शाळा क्रमांक 1,तुळजापूर चे मुख्याध्यापक युवराज मगर, सहशिक्षक  बाळासाहेब जेटीथोर, महेंद्र पाटील ,  निर्मला कुलकर्णी , अशोक शेंडगे   जालिंदर राऊत,श्री.महेंद्र कावरे, सुरजमल शेटे, विश्वजीत निडवंचे, रविकुमार पवार, ज्योती ताटे,   दिव्याराणी हुंडेकरी,  शुभांगी जाधव, बालवाडी शिक्षिका  यास्मिन सय्यद,  सरस्वती कदम,सेवक  संदीप मान, शोभा कांबळे, कल्पना व्हटकर यांची उपस्थिती होती.

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  अशोक शेंडगे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक  तुकाराम मोटे यांनी मानले.


 
Top