धाराशिव / प्रतिनिधी-

 महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनाची पूर्व तयारी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

  यावेळी या बैठकीस उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, उस्मानाबाद तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आर.एस.कोतवाले, उपशिक्षणाधिकारी (माध्य.) चे रावसाहेब मिरगणे, नगर परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी.एम.पवार, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रतिनिधी, पोलिस अधीक्षक यांचे प्रतिनिधी, डी.एन. देशपांडे, विनायक मेटकरी, के.एस.राठोड आदींची उपस्थिती होती.

 1 मे 2023 रोजी होणाऱ्या महाराष्ट्र दिनाच्या पूर्व तयारीच्या बैठकीत बोलताना उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने जबाबदारीने काम करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.

 
Top