धाराशिव / प्रतिनिधी-

महाराष्ट्र पोलीस टाईम्स न्यूज चॅनल च्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले...राजाराम केलुरकर हे धाराशिव येथे पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार या पदावर असून त्यांनी कोरोना काळात पुरवठा विभागाची जबाबदारी अतिशय समर्थ पणे सांभाळून विविध योजनेत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना मालाचे वितरण करून वीणा त्रास धान्य वितरण करून संपूर्ण जिल्ह्यात आदर्श निर्माण केला तसेच दवाखान्याच्या कामासाठी लागणारे रेशन कार्ड आणि महात्मा फुले योजनेचे प्रमाणपत्र तर त्याच दिवशी प्राधान्य क्रम देत लोकांना देऊन रुग्ण सेवे सारखे पवित्र काम देखील केले आणि त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र पोलीस टाईम्स न्यूज चॅनल च्या वतीने विशेष सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले....त्यांना धर्मादाय आयुक्त श्री.एस.पी पाईकराव,आणि महाराष्ट्र पोलीस टाइम्स चे मुख्य संपादक श्री उमेश जी काळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले...या वेळी बोलताना त्यांनी आमच्या सारख्या अधिकाऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन जो गौरव केला आहे त्या मुळे येणाऱ्या काळात काम करण्यासाठी नवी ऊर्जा मिळाली असून हा जो उपक्रम राबविला जात आहे त्याचेही कौतुक केले...त्यांना मिळालेल्या पुरस्काराने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे या वेळी कार्यक्रमास महाराष्ट्र पोलिस टाइम्स चे महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी मनोज जाधव,संतोष दुधभाते, पवन कदम आणि विशाल पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर हजर होते.


 
Top