धाराशिव / प्रतिनिधी-

 महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63  वा वर्धापन दिनाच्या निमीत्ताने राष्ट्रध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम दि. 1 मे 2023 रोजी पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या शुभहस्ते सकाळी ठीक 8.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगण येथे संपन्न होणार आहे. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाच्या दिवशी विविध मागण्या संदर्भात लोक, संघटना, पक्ष, कार्यकर्ते हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण, धरणे, मोर्चा, रॅली, आत्मदहन, रस्ता रोको अशा कार्यक्रमांचे आयोजन करतात.

  त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये तसेच श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते सर्कीट हाऊस शिंगोली पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करणे आवश्यक आहे.  दि. 30  एप्रिल 2023 चे रात्री 12.00 वाजेपासून ते दि. 1 मे 2023 च्या रात्री 12.00 वाजेपर्यंत आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. असे आदेश धाराशिवचे उपविभागीय दंडाधिकारी योगेश खरमाटे यांनी जारी केले आहे.


 
Top