तुळजापूर/ प्रतिनिधी-

महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या चैञी  पोर्णिमा ,दिनी गुरुवार दि. ६रोजी देविदर्शनार्थ व  देविचरणी पोर्णिमा वारी अर्पण करण्यासाठी लाखोच्या संखेने भाविक येवुन देविदर्शन घेऊन देविचरणी वारी अर्पण केली.

 श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानचे चैञी पोर्णिमेचे विधी बुधवार करण्यात आले.

बुधवारी राञी मंदीर प्रांगणात छबिना काढण्यात आल्यानंतर मंदीर प्रांगणात देविचे महंतवाकोजीबुवागुरुतुकोजीबुवा यांनी जोगवा मागितल्या नंतर खोब-याचा प्रसाद वाटप  केल्यानंतर चैञी पोर्णिमा उत्सवाचा धार्मिक विधीचा सांगता झाला. बुधवार सांयकाळ पासुन भाविक वाजतगाजत आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदोच्या गजरात तिर्थक्षेञ तुळजापूरात पोर्णिमासाठी दाखल होत होते.

गुरूवारी श्रीतुळजाभवानीची  वारी पोहोचती करून, भाविक  येडाईदेवीचा दर्शनार्थ येरमाळ्या कडे जात होते. श्रीतुळजाभवानी  मातेचे चैञी पोर्णिमेचे दर्शन घेण्यासाठी  गुरुवार  भाविकांनी अभिषेक धर्म  दर्शन मुखदर्शन पेड दर्शन रांगा दिवसभर भाविकांनी भरभरुन राहिल्या 

गुरुवार पहाटे ऐक वाजता चरणतिर्थ होवुन धर्म दर्शनास आरंभ झाला. सकाळी सहा वाजता  भाविकांचे  दहीदुधपंचामृतअभिषेक आरंभ झाले ते दहा वाजता संपल्यावर देविजीस वस्ञोलंकार घालण्यात येवुन धुपारती करण्यात आली 

आज खास करुन महिला पुरुष देविभक्तांनि गळ्यात कवड्याचि 

माळ हाति माळपरडी व परशुराम घेवुन देवदर्शन करुन चैञी पोर्णिमा वारी पारंपारिक पध्दतीने देवीचरणी अर्पण केली व 

सांयकाळी देविजीस भाविकांचे दही, दुध,पंचामृत,अभिषेक करण्यात आल्यानंतर वस्ञोलंकार घालण्यात आले व नंतर आराधी भाविक उपस्थितीत मंदीर प्रांगणात छबिना काढण्यात आला.


 
Top