तुळजापूर/ प्रतिनिधी-

  येथील उपजिल्हा रूग्णालयात गरीब कुंटुंबातील डोळ्याने कमी दिसणाऱ्या व ऐकु न येणाऱ्या ८५वर्षाचा ऐकटा  आलेल्या वृध्द रुग्णांवर येथील डाँक्टर कर्मचाऱ्यांनी  उपचार करताना जी माणुसकी दाखवली त्यामुळे  उपचार झालेल्या वृध्द रुग्णाने मला  तुमच्या  रुपाने मला पांडुरंग भेटला अशी प्रतिक्रिया देवुन वृध्द समाधानाने गावी   रवाना झाला 

ही घटना तुळजापूर येथील  उपजिल्हारूग्णालयातील डाँक्टर कर्मचाऱ्यांनी दाखवलेली माणुसकी ची आहे  हा घटना सध्या सर्वञ चर्चचा विषय बनली आहे.

 या बाबतीत अधिक माहीतीअशीकी उस्मानाबाद तालुक्यातील सिध्देश्वर वडगाव  येथील  वृदास उपचारासाठी धाराशिव जायचे होते चुकुन तुळजापूर ला असता ऐकाने  त्यास उपजिल्हारूग्णालय समोरील रोडवर सोडले तेथुन भरऊन्हात काठी ठेकवत तो रुग्णालयात आला कमी दिसत ऐकु येत  असल्याने  रुग्ण नातेवाईकाने त्यास रुग्णालयात आणले असता  त्याने दहा रुपये काढुन पावती काढण्यास दिली असता रुग्णालयातील कर्मचाऱ्याने पैसे न घेता पावती दिली.

या आजाराने  पांडुरंगाची वारी चुकली   हातपाय सुजलेत ऐक इंजेकशन द्या  नीट होतो असे  मदत करणाऱ्यांना म्हणत होते  काय करावे अवघड आहे, असे म्हणत 

रामराम श्रीराम जयराम जयराम रामकृष्ण हरि असा त्याचा म्हणी गजर होता.डाँक्टरांनी तपासली व त्याला दवाखान्यातील गोळ्या लिहुन दिल्या पण ऐकु येत नसल्याने सांगणार कोन गोळ्या  देणाऱ्या महिल्या कर्मचाऱ्यांने गोळ्यावर कधी  घ्यायच्या त्या लिहुन दिल्या  नंतर 

जवळची लवंग सगळ्यांना खायला दिली.व डाँक्टर कर्मचारी रुपाने पांडुरंग भेटला म्हणत गावी रवाना झाले . या उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी डाँक्टरांनीजी  माणुसकीचे दर्शन घडवले  त्याची चर्चा सर्वञ होत आहे.


 
Top