परंडा/ प्रतिनिधी-

 ज्वलंत हिंदुत्वाचे विचारक, राष्ट्रप्रेमाचे प्रतीक असलेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या गौरवार्थ संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टी-शिवसेना यांच्या वतीने "सावरकर गौरव यात्रा" काढण्यात येत आहे. 

ही यात्रा दिनांक 8 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता परंडा येथे येत असून छत्रपती शिवाजी महाराज चौकात "सावरकर गौरव यात्रेचे" आगमन होणार आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज चौकात "सावरकर गौरव यात्रेचे" भव्यदिव्य स्वागत करण्यात येणार आहे. सदरील यात्रा तेथून पुढे आठवडी बाजारतळ, मंडई पेठ मार्गे जाणार असून कल्याणसागर बॅंके जवळील नवीन श्रीराम मंदिरात या यात्रेचा समारोप होईल.*

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्यावर,राष्ट्र निष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार्या बांडगुळांना या गौरव यात्रेतुन उत्तर देण्यासाठी सर्व राष्ट्रप्रेमी नागरिक, बंधू, भगिनी,युवक, युवती,सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख अण्णासाहेब जाधव, शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब गायकवाड, भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष ॲड. संदीप शेळके, युवासेना तालुकाप्रमुख राहुल डोके, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अनिल पाटील, युवासेना शहरप्रमुख वैभव पवार, भाजपा महिला मोर्चा शहर अध्यक्ष ज्योतीताई भातलवंडे यांनी केले आहे.


 
Top