भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे  जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

धाराशिव / प्रतिनिधी- 

धाराशिव जिल्हयात शनिवारी  दिनांक आठ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने शेतकरयाच्या  पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. बळीराजाच्या तोंडातला घास अवकाळी पावसाने हिरावुन घेतला त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून  राज्यसरकारने तातडीन मदत जाहीर करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने आज शुक्रवारी (दि.13) रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.

निवेदनावर भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे पुर्व मराठवाडा संपर्क प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे, किसान मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सतिश देशमुख, तालुकाध्यक्ष नानासाहेब कदम, भाजपा सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष तौर, भाजपा लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, ता. सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, भाजपा जिल्हा चिटणीस गुलचंद व्यवहारे, अभिषेक कोळगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सदरील निवेदनाच्या प्रती मुख्यमंञी व उपमुख्यमंञी यांना ईमेलद्वारे पाठवण्यात आल्या आहेत.


 
Top