धाराशिव / प्रतिनिधी-

शहरातील प्रसिध्द सर्जन डाॅ.विजयकुमार हरिराम मैंदरकर (७५) यांचे दुर्धर आजाराने गुरूवार दि. २७ एप्रील रोजी पहाटे लातूर येथे निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर गुरूवारी दुपारी लातूर येथील राजस्थान स्मंशानभुमीत अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी लातूर-धाराशिव परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

धाराशिव शहरात पहिले सुसज्ज खासगी हॉस्पीटल डॉ.मैंदरकर यांनी सुरू केले होते. डॉ. मैंदरकर यांनी रोटरी क्लबचे अध्यक्ष म्हणून ही काम केले आहे. रोटरीच्या अजमेरा आय हॉस्पीटलचे ते संस्थापक विश्वस्त होते. त्यांच्या मागे लातूर येथील प्रसिध्द बालरोगतंज्ञ विशाल मैंदरकरसह दोन विवाहित मुली, पत्नी, जावाई, नातवंडे असा परिवार आहे. धाराशिव शहरातील प्रसिध्द विधिज्ञ अॅड. अविनाश मैंदरकर यांचे ते चुलते होते. 

 
Top