एम.बी.बी.एस.मेडिकल कॉलेजला मान्यता
धाराशिव / प्रतिनिधी-
धनेश्वरी शिक्षण समूहाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून सन २०२३-३४ या शैक्षणिक वर्षापासून परभणी येथे १५० प्रवेश क्षमतेच्या आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट आणि एम.बी.बी.एस.मेडिकल कॉलेजला एन.एम. सी.नवी दिल्ली यांनी मान्यता दिली आहे.
नवीन एम.बी.बी.एस.मेडिकल कॉलेज मुळे धनेश्वरी शिक्षण समूहाच्या शिक्षण संस्थेत आणखी एका महत्त्वपूर्ण शिक्षण संस्थेची भर पडली असून मेडिकल क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुणे मुंबईच्या मेडिकल कॉलेज प्रमाणे अत्याधुनिक व सर्व सोयीयुक्त असे हे कॉलेज असणार आहे.तसेच येथे उच्च गुणवत्ता प्राप्त व अहर्ता धारक डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली आर.पी.हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटची देखील सुरुवात झाली आहे.
धनेश्वरी शिक्षण समूहामध्ये औषध निर्माण शास्त्र, कृषी,शिक्षणशास्त्र, इंजिनियरिंग व मेडिकल क्षेत्रात अनेक महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत आहे. आता त्यामध्ये या नवीन मेडिकल एम.बी.बी.एस. कॉलेजची त्यामध्ये भर पडली असून या नवीन कॉलेजमुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय होणार आहे. तसेच गरजू रुग्णांची देखील या ठिकाणी चांगली सोय होणार आहे.
धनेश्वरी शिक्षण समूहाला आर.पी.हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट आणि एम.बी.बी.एस.मेडिकल कॉलेज धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी अधिकारी वर्ग, महाविद्यालयासाठी झटणारे सर्व कर्मचारी वृंद व ज्ञात अज्ञात ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानले आहेत.