धाराशिव/ प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन शनिवार दि.०१ एप्रिल २०२३ रोजी अणदूर, ता.तुळजापूर  येथे सकाळी १०:०० ते ४:०० या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात अणदूर व परिसरातील सर्व वयोगटातील ५००  महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

 कार्यक्रमाचे उद्घाटन  दिपक दादा आलुरे, यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे, दयानंद मुडके, दिपक घोडके, काशिनाथ काका शेटे, बालाजी कुलकर्णी, गणेश देवसिंगकर, प्रवीण घोडके, शिवा बिराजदार, लक्ष्मण लंगडे,  इत्यादी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.‍ अजित निळे, डॉ.विश्वजीत कदम, डॉ. क्लिंटन डिसील्वा, डॉ.ऐश्वर्या, डॉ.दिपक नायर, डॉ.अजय राघवन यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे विनोद ओव्हळ, अबुल हसन रजवि, पवन वाघमारे,  निशिकांत लोकरे, सचिन व्हटकर, व अणदूर केंद्राचे डॉ. चंद्रकात बडे व  आशा कार्यकर्ता सुनिता मोकाशे, चंपा सुर्यवंशी, शिवशाला घुगे, आशा बोर्डे, सुरेखा काबंळे, जयश्री तळवार, सत्यशिला चव्हाण, मनिषा काबंळे, लक्ष्मी दुपारगुडे यांनी परीश्रम घेतले.

 
Top