धाराशिव / प्रतिनिधी-
महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे विजेच्या धक्क्याने मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांची व पशुधनाची जिल्ह्यातील आकडेवारी जाहीर करावी. तसेच प्रस्तावित वीज दरवाढ रद्द करून शेतकºयांची सक्तीची विज बिल वसुली थांबविण्यात यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात बुधवारी (दि.१) दिलेल्या निवेदनात हा इशारा देण्यात आला आह.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दुधगावकर यांनी म्हटले आहे की, प्रस्तावित वीज दरवाढ विद्युत नियमक आयोगाकडे चुकीच्या भरपाईची एकूण दोन वर्षाचा हिशोब करून मागणी केली, त्यामध्ये सरासरी ३७ टक्के दरवाढ आहे. एकूण परिणामी वाढ सरासरी २.५५ प्रति युनिट आहे. ही वीज दरवाढ म्हणजे एकप्रकारे अन्याय आहे. ती दरवाढ पूर्णपणे रद्द करून इतर राज्याच्या तुलनेत करावी. तसेच २७ फेब्रुवारी २०२३ पासून महावितरण कार्यालयाकडून शेतकºयाची सुरू असलेली विज बिल वसुली थांबून शेतकºयांना २४ तास वीज उपलब्ध करून द्यावी. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेल्या शेतकºयांची व पशुधनांची जिल्ह्याची आकडेवारी जाहीर करून त्यांना ताबडतोब आर्थिक मदत करण्यात यावी, अन्यथा या विरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या निवेदनात श्री दुधगावकर यांनी दिला आहे.