धाराशिव / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंह  पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन जगदंबा मंदिर, खामसवाडी येथे  करण्यात आले होते. 

या आरोग्य शिबीरात खामसवाडी व परिसरातील सर्व वयोगटातील ९०० महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

 कार्यक्रमाचे उद्घाटन उपसरपंच किरण पाटील यांच्या हस्ते झाले. यावे प्रमुख पाहुणे ग्रा.प.सदस्य नितीन बंडगर, व्हाईस चेअरमन भगवान झोरी, संचालक शेशेराव शेळके, शरद सिरसट, बालाजी चौरे, विलास शेळके, दत्तात्रय डोईफोडे, सुंदर माळी, दिपक सावंत, ज्ञानेश्वर बंडगर, सुशील पाटील, निसार मुंडे, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.‍ अजित निळे, डॉ शैलेश पाटील, डॉ. चंद्रेश पटेल, डॉ. यश पटेल, डॉ. आदिल शेख, यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे नामदेव शेळके, विनोद ओव्हळ, अमिन सय्यद, पवन वाघमारे, मुकुंद कोरे, निशिकांत लोकरे, सचिन व्हटकर, रवी शिंदे व खामसवाडी प्रामथिक आरोग्य केंद्राचे डॉ.आडसुळ व आशा कार्यकर्त्यां यांनी परीश्रम घेतले.

 
Top