धाराशिव / प्रतिनिधी-

जनहित शेतकरी संघटनेचे सोनेगाव येथे पीक विमा व अतिवृष्टी अनुदानासाठी शेतकरी आक्रमक,जमिनीत गाडून आंदोलन केले. 

याबाबत अिधक माहिती अशी की, पीक विमा व अतिवृष्टी अनुदानाचे पैसे मिळावे यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.

सोनेगाव येथे 7 शेतकऱ्यांनी स्वतःला जमिनीत कंबरेपर्यंत गाडून घेऊन आमरण उपोषण आंदोलन सुरु केले आहे. जिल्ह्यात 2022-23 च्या अतिवृष्टी व पीक विम्याचे पैसे न दिल्याने आंदोलन सुरु केले आहे. जनहित शेतकरी संघटनाने शेतकऱ्यांसह यापूर्वी रास्ता रोको, पीक विमा कंपनी कार्यलय तोडफोड करूनही अनुदान रक्कम न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झालं आहेत.यावेळी मुख्यमंत्री, कृषीमंत्री सरकार विरोधी घोषणाबाजी केली.

 
Top