परंडा / प्रतिनिधी: - 

 हवामान बदलामुळे मानवाचे जीवनशैली बदलू शकते.सुपीक जमिनीचे रेताळ जमिनीत रूपांतर होईल, पाण्याच्या कमतरतेमुळे , अन्न उगवण देखील कठीण , समुद्राच्या पातळीत होत असलेल्या वाढीमुळे काही भागात प्रचंड उष्णता वाढेल आणि ते ठिकाण निवास करण्यास योगी राहणार नाही असे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्र उस्मानाबाद येथील भूजल व्यवस्थापन विभागाचे प्रोफेसर डॉ नितीन पाटील यांनी श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा येथे आयोजित केलेल्या दोन दिवशीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आणि शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिनांक १३ व १४ मार्च २०२३ रोजी  विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती.या कार्यशाळेच्या दोन दिवशीय उद्घाटन समारंभासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव उपस्थित होते.तर दोन दिवसाच्या कार्यशाळेसाठी डॉ प्रशांत दीक्षित सूक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्र उस्मानाबाद यांनी ग्लोबल वार्मिंग या विषयावर आपलं व्याख्यान दिले तर डॉ सचिन चव्हाण शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा यांनी पर्यावरण प्रदूषण या विषयावर व्याख्यान दिले. दि.१४ मार्च रोजी डॉ नितीन पाटील यांनी इफेक्ट ऑफ क्लायमेट चेंज ओन एग्रीकल्चर अँड देयर रेमेडीज या विषयावर व्याख्यान दिले तर दुसऱ्या सत्रामध्ये डॉ नितीन पडवळ शंकरराव पाटील महाविद्यालय भूम यांनी बायोडायव्हर्सिटी या विषयावर आपले व्याख्यान दिले . श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात अनेक कार्यशाळा कॉन्फरन्स आयोजित केल्या जात आहेत.या दोन दिवसाच्या कार्यशाळेच्या अनुषंगाने व्यासपीठावर प्राचार्य डॉ सुनील जाधव, उपप्राचार्य डॉ महेशकुमार , वनस्पतीशास्त्र  विभाग प्रमुख डॉ प्रकाश सरवदे, डॉ सचिन , डॉ शहाजी चंदनशिवे उपस्थित . कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ महेशकुमार माने यांनी केले.प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ अतुल हुंबे आणि डॉ प्रकाश सरवदे यांनी केला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सचिन चव्हाण आणि डॉ विद्याधर नलवडे यांनी केले.या  कार्यशाळेसाठी हिंदी विभाग प्रमुख डॉ बी वाय माने, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ अक्षय घुमरे, प्राणीशास्त्र भाग प्रमुख डॉ अतुल हुंबे यांची उपस्थिती होती.या कार्यशाळासाठी महाविद्यालयातील वरिष्ठ विभागाचे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . शेवटी कार्यक्रमाचे आभार डॉ सचिन चव्हाण यांनी  मानले.

 
Top