परंडा / प्रतिनिधी: - 

शिवजयल क्रांतीचे प्रणेते आरोग्य मंत्री तथा जिल्हयाचे पालक मंत्री तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून सुरु केलेल्या प्रत्यक्षात साकार झाले असून स्व.बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रान्ती योजनेतंर्गत नदी खोलीकरण व रुंदीकरणाच्या चौथ्या टप्प्याच्या कामास प्रारंभ गुरुवारी दि.१६ रोजी देवांग्रा येथून करण्यात आला.  विश्वरूपा नदीच्या खोली व रुंदीकरणाच्या कामाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.

   यावेळी प्रा.तानाजीराव सावंत प्रतिष्ठानचे राज्य अध्यक्ष रामचंद्र घोगरे, शिवसेना धाराशिव जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा अर्चना दराडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती दत्तात्रेय मोहिते, भूम शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी गुंजाळ, पिंटू सांगडे, तानाजी कोलते, विष्णू सांगडे, गुलाब शिंदे, विशाल ढगे, विठ्ठल काकडे, पोपट चोबे, शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब गायकवाड, युवा सेना शहर प्रमुख वैभव पवार, सतीश मेहेर, सरपंच विश्वास टाकले, उपसरपंच भाऊसाहेब डोके, माजी सरपंच बिबीशन डोके, सावरगाव माजी सरपंच संजय बोराडे, चंद्रकांत जाधव, विजय पाटील आदी उपस्थित होते.


 
Top