परंडा/ प्रतिनिधी - 

परंडा तालुक्याच्या  विकासासाठी सर्व पक्षीय समिती स्थापण करून परंडा तालुक्याचे नाव महाराष्ट्रात उज्वल करु असे प्रतिपादन अॅड.  मिलिंद पाटील बार कॉन्सील ऑफ महाराष्ट,व गोवा राज्याचे अध्यक्ष यांनी आजोजित सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले.         

 परंडा येथील शासकीय विश्राम गृह येथे दिनांक १४ मार्च मंगळवार रोजी सायंकाळी ६ वाजता  परंडा नगरीचे माजी नगर अध्यक्ष सुभाषसिंह  सद्दीवाल  यांनी परंड्याचे सुपूत्र अॅड मिलींद पाटील यांची बार कॉन्सील महाराष्ट्र अँड गोवा अध्यक्ष पदी व तालुक्यातील रोसा येथील अॅड विश्वजित पाटील यांची पुणे बार असोशिएशनच्या  उपाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल या दोन्ही भुमि पुत्रांचा नागरी सत्काराचे अयोजन करण्यात आले होते या वेळी  प्रमुख पाहुणे म्हणुन भाजपा प्रदेश सरचिटनिस माजी आमदार सुजितसिंह ठाकूर  व प्रमुख उपस्थिती  म्हणुन जेष्ट विधीज्ञ धाराशिव जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष  काँगसचे नेते अॅड दादासाहेब खरसडे , जिल्हा परिषद शाळेचे  माजी जेष्ट आदर्श शिक्षक शिवाजी कदम सर यांच्या हस्ते सत्कार मुर्तींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

      यावेळी अॅड विश्वजीत पाटील यांचे पिताश्री प्रा.मधुकर पाटील  राष्टवादीचे नेते अॅड  सुभाष वेताळ , बिबीशन काशीद , पोपट  गटकुळ , भैरवनाथ देवस्थान चे मुख्य पुजारी संजय महाराज पुजारी    तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे परंडा तालुका प्रमुख मेघराज पाटील ,राष्ट्रवादीचे परंडा तालुका अध्यक्ष अॅड संदिप पाटील ,जनार्धन मेहेर,   युवानेते रणजित पाटील,इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.    

या सत्कार सोहळयात माजी आमदार सुजितसिंह ठाकूर माजी शिक्षक शिवाजी कदम सर यांनी अॅड मिलिंद पाटील व ॲड विश्वजीत पाटील यांच्या निवडी बद्दल अभिनंदाचा वर्षाव करत  त्यांच्या कार्याबद्दल गुण गौरवपर विचार मांडले तसेच जेस्ट प्राध्यपक मधुकर पाटील ,पोपट गटकुळ, सुभाष सिंहसद्दीवाल , बिबिशन काशीद ,जनार्धन मेहेर, लक्ष्मीमण भानवसे अदिनी त्यांच्या गुण गौरवावर अभिनंदपर भाषण केले. 

 पुढे सत्काराला उत्तर देताना अॅड मिलींद पाटील म्हणाले मी परंडा हे माझी जन्मभुमि असुन मी परंडा येथील जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलो माझे वर्ग  मित्र सुभाषसिंह सद्दीवाल भाजपा जिल्हा सर चिटणीस विकास कुलकर्णी , जनार्धन मेहेर , लक्षमण भानवसे असे शेकडो जनांची नावानिशी सांगितली  ते पुढे म्हणाले की मी परंडा येथील मातीत जन्मलो आणि घाराशिव जिल्हा येथील न्यायालयात वकीली व्यवसाय करून  महाराष्ट व गोवा बार काँन्सील ऑफ महाराष्ट्र निवडणुकीत मी निवडुन आलो  या निवडी बद्दल माझा सत्कार माझे वर्ग मित्र माजी नगरध्यक्ष सुभाषसिंह सद्धीवाल  व त्यांच्या मित्र परिवाराने माझा मोठ्या थाटात सत्कार सोहळा साजरा केला त्यांचे मनपुर्वक अभार मानतो ते पुढे म्हणाले की येत्या १७ सप्टेंबर २०२३ ला मराठवडा मुक्ती संग्राम दिन ७५ वा अमृत मोहत्सदिन मोठ्या उत्सहात साजरा करावा मी ही सहभागी होणार असल्याचे शेवटी म्हटले. या कार्यकमाचे सुत्र संचालन  माजी नगर अध्यक्ष रमेशसिंह परदेशी व आभार माजी नगर अध्यक्ष सुभाषसिंह सद्धीवाल यांनी मानले

 
Top