धाराशिव / प्रतिनिधी-

 हळदगाव येथील विष्णु विनायक गुंड व प्रशांत सावंत या दोघांच्या हाळदगाव शिवारातील शेतामध्ये गोठ्या समोर बांधलेल्या अंदाजे 1,60,000 रू. किंमतीच्या  दोन जर्शी गायी ह्या अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या होत्या. यावरुन पोलीस ठाणे येरमाळा येथे गुन्हा रजि. नं. 51/2023 कलम 379 भा.द. सं. प्रमाणे दाखल आहे.

   गुन्हा तपासादरम्यान मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व  अपर पोलीस अधीक्षक  नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली व कळंब उप विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक यांच्या सुचनांप्रमाणे येरमाळा पो.ठा. चे प्रभारी सपोनि-   दिनकर गोरे, यांनी गावकामगार महेश पांचाळ यांनी कळविलेल्या माहितीवरुन  तात्काळ बिट अंमलदार प्रकाश चापेकर यांना बोलावून चोरीस गेलेल्या गायीचा शोध घेणेकामी एक पथक तयार करुन मिळालेल्या माहितीवरुन हळदगाव, सातेफळ, सौदाणा, येडशी शिवारामध्ये रवाना होउन पोलीस हावलदार चाफेकर यांना मळाली की, हळदगाव येथील सतिश अभिमान सावंत यांने सदरची चोरी केली असावी. सदर इसमाचा शोध पोलीस घेत असताना सतिश सावंत हा सातेफळ सौदाणा रोडला तेरणाअदीचे पुलावर चोरीस गेलेल्या  गायीसह मिळून आला. पोलीसांनी आरोपी  व गायीनां ताब्यात घेउन सदरचा गुन्हा कांही तासात उघडकीस आणला आहे.

 सदरची कामगीरी पोलीस ठाणे येरमाळा चे प्रभारी सपोनि दिनकर गोरे, पोलीस हावलदार-प्रकाश चाफेकर,दत्तात्रय राठोड, पोलीस अमंलदार  परमेश्वर कदम, गृहरक्षक दलाचे जवान मैदांड यांनचे पथकाने केली आहे.


 
Top