धाराशिव / प्रतिनिधी-

 येथील पांचाळ सोनार समाज सेवा संस्थेच्या वतीने दि.24 मे 2023 रोजी  भव्य सामुदायिक उपनयन संस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष तथा मा.सहशिक्षक  मनोज पंडीत यांनी  दिली आहे.शहरातील  पुष्पक मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी राज्यभरातून नोंदणी होत असुन  धाराशिव शहर तसेच जिल्हयातील ज्या पालकांनीअदयाप नोंदणी केलेली नाही  त्यांनी त्वरीत करुन घ्यावी विशेष म्हणजे

 या कार्यक्रमातच  खेळ, क्रीडा ,साहित्य ,सांस्कृतिक शिक्षण ,समाजसेवा,जनसेवा, कला,संगीत,गायन आदी क्षेत्रात उल्लेखनिय कार्य व कामगिरी  करणाऱ्या समाजातील सत्कारमुर्तीचा पुरस्कार देवुन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.  धाराशिव शहरात प्रथमच भव्य असा सामुदायिक उपनयन संस्कार कार्यक्रम आयोजित करण्यात येत  असल्यामुळे या कार्यक्रमाच्या  निमित्ताने राज्यभरातून  समाजातील मान्यवर व्यक्तींची उपस्थिती असणार आहे तरी या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातुन मोठया प्रमाणात नोंदणी करावी यासाठी  समाजातील इच्छुक पालकांनी 

 श्री मनोज पंडित सर 8668359084 यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधुन त्वरीत नोंदणी करावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री.मनोज पंडीत यांनी केले आहे.


 
Top