धाराशिव / प्रतिनिधी-

लोकमंगल फाउंडेशनच्या धाराशिव येथे छाया दीप मंगल कार्यालयात शनिवार दिनांक 18 मार्च रोजी पार पडलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात अकरा जणांचे विवाह लावण्यात आले. या विवाह सोहळ्याचे अठरावे वर्ष होते. दुपारी बारा वाजून 35 मिनिटांनी पार पडलेल्या या विवाह सोहळ्याला धाराशिव जिल्ह्यातील आणि लगतच्या जिल्ह्यातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी लोकमंगल फाउंडेशन चे प्रणेते आ.  माननीय सुभाष बापू देशमुख, तुळजापूरचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील, फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख, युवा नेते मनीष देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, रामराजे पाटील मामा, दत्ता कुलकर्णी, व्यंकट गुंड, रामदास कोळगे, जय राजे निंबाळकर, सुधीर रास्ते नाना लोमटे,बालाजी शिंदे तसेच धाराशिव जिल्ह्यातील भाजपाचे कार्यकर्ते आणि लोकमंगल परिवारावर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते तसेच या कार्यक्रमात विवाह पार पडलेल्या वधूवरांचे अनेक नातेवाईक आणि वर वऱ्हाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वऱ्हाडी आणि हितचिंतक यांच्यासाठी फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक भोजनाचा लाभ असंख्य लोकांनी घेतला.


 
Top