उमरगा/ प्रतिनिधी-

 हजारो हिंदू - मुस्लिम बांधवांचे श्रध्दास्थान असलेल्या येथील हजरत सय्यद बाशा दर्ग्याच्या ऊरुसाला गुढीपाडव्यापासुन बुधवार ( दि. २२) पासुन सुरुवात होत आहे.

तीन दिवस चालणाऱ्या यात्रा उत्सवात धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सांयकाळी चार वाजता वृक्ष लागवडीचा कार्यक्रम होईल, त्यानंतर सांयकाळी सात संदल शरिफ (मिरवणूक) निघेल. गुरुवारी (दि. २३) चिराग व ऊर्स कार्यक्रम होईल. या दिवशी हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. शुक्रवारी (ता. २४) सकाळी सात वाजता जियारत व दुपारी तीन वाजता कुस्त्याचा फड रंगणार आहे. शेवटची कुस्ती ७,७८६ रुपयाची होणार आहे. भाविकांनी यात्रा महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन  हजरत सय्यद बाशा ऊरूस समितीच्या वतीने करण्यात आले आहे. ऊरूस समितीचे अध्यक्ष जाहेद मुल्ला, उपाध्यक्ष सय्यद मुल्ला, असलम (भाईजी) शेख, सत्तार मुल्ला, महेबुब मुल्ला, महमदसाब सास्तुरे, अविनाश काळे, राजु कुंभार, रसुल शेख, महेबुब उजळंबे, बबलु बलसुरे, मुसा मुल्ला, मशाक फुलारी   जब्बार मुल्ला, बाबु मुल्ला, बाबा बलसुरे, अल्लाउद्दीन उजळंबे, कैलास काळे, रज्जाक शेख, इस्राईल शेख, अमन भालके,  इब्राहीम मुल्ला, निसार मुल्ला आदींनी ऊरुसच्या यशस्वितेसाठी पुढाकार घेतला आहे.

 कुस्ती फड रंगणार !

 मध्यंतरीच्या कोरोना संसर्गामुळे कुस्तीच्या फडातील गर्दी कमी झाली होती. यंदा मल्लांना कुस्ती फडात आपल्या कौशल्याची चुणूक दाखविण्याची संधी मिळणार आहे. ऊरुस समितीने शेवटची कुस्ती जिंकणाऱ्या मल्लास ७,७८६ रुपयाचे बक्षिस देण्याचा निर्णय घेतला आहे. उस्मानाबाद, लातूर, सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटकातील पैलवानांनी कुस्ती फडात सहभागी होण्याचे आवाहन ऊरुस समितीने केले आहे.

 
Top