धाराशिव/ प्रतिनिधी-

 शहरातील शिवशंभूपंढरी वसाहत सार्थसत्य येथे संस्कार भारती धाराशिव जिल्हा समितीची आयोजित बैठकीत संस्कार भारती देवगिरी प्रांताचे महामंत्री जगदिश देशमुख व सहकोष प्रमुख अभय श्रृंगारपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

 प्रथम सदस्य अनिल मालखरे यांचे चि. अभिजीत मालखरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . त्यानंतर संस्कार भारती  ध्येयगीतांनी सुरुवात होऊन विविध विषयानुसार चर्चा होऊन देवगिरी प्रांत संस्कार भारती दैनंदिनी २०२३ - २४ विषयी महामंत्री व सहकोषप्रमुखांनी धाराशिव जिल्हा समितीचे अभिनंदन करुन मार्गदर्शन केले शेवटी मान्यवरांचा शाल व भगवत गीता देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी देवगिरी प्रांत मार्गदर्शक सुधीर कुलकर्णी, सहचित्रकला विधाप्रमुख तथा जिल्हा समिती मार्गदर्शक शेषनाथ वाघ जिल्हा प्रमुख श्यामसुंदर भन्साळी , सचिव प्रभाकर चोराखळीकर, शहर संयोजन समिती अध्यक्ष शरद वडगावकर, मुकुंद पाटील- मेंढेकर आदि मान्यगण सदस्य उपस्थित होते. बैठकीनंतर महामंत्री जगदिश देशमुख अभय श्रृंगारपुरे ऐतिहासिक धारोहर धाराशिव लेणी पाहून या लौकिक ठेव्याचे जतन व्हावे याकरिता समितीने लक्ष देऊन प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा व्हावा हि उपेक्षा व्यक्त केली.

 
Top