तेर/ प्रतिनिधी-

 धाराशिव तालुक्यातील कोळेकरवाडी येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथी मधील चिमुकल्याना बचतीचे महत्त्व कळले असून दरमहा जमा केलेल्या बचतीमधून गावासाठी वाचनालय सुरू करण्याचा निर्धार या चिमुकल्यानी बोलून दाखविला.कोळेकरवाडी हे अवघे तीनशे चारशे लोकवस्तीचे गाव आहे याठिकाणी जि.प.ची चौथी पर्यंत शाळा आहे .रविराज कोळेकर अभय कोळेकर,सोहम कोळेकर,रोहित बंडगर,विजय कोळेकर,ओमप्रकाश काळे,समीर कोळेकर,दयानंद कोळेकर , राहूल बंडगर या विध्यार्थ्यांनी आई कुलस्वामिनी तुळजाभवानी बचत गट स्थापन करून  दर सोमवारी प्रत्येक विध्यार्थ्यांकडून 5 रू बचत जमा केली  या उपक्रमाला  मुख्यध्यापिका अर्चना पाटील सहशिक्षिका शांता सलगर यांनी प्रोत्साहन दिले.या उपक्रमास गावातील 5 ते  7 वी वर्गात शिकत असलेल्या मुलांनीही  प्रतीमहिना 20 रू बचत जमा केली.महिन्याच्याअखेरीस हिशोब सादर करण्यात येतो.जमलेल्या  650 रूपयातून 500 रू चे  गावातील नवरात्र गणपती उत्सवात वाजविण्यासाठी छोटे वाद्य खरेदी केले.आता यापुढे बचतीमधून जमा झालेल्या पैशातून लहान गोष्टीचे पुस्तके,खरेदी करून वाचनालय सुरू करण्याचा उपक्रम सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला.जेणेकरून गावातील अबाल वृध्दांना वाचनाची आवड निर्माण करण्याचा मानस व्यक्त केला .एवढेच नव्हेतर विध्यार्थ्यांना वही ,पुस्तकासाठी  गरज पडली तर मदत करीत असतो असे अध्यक्ष म्हणून काम पहात असलेल्या अभय कोळेकर यांनी सांगितले.लहान वयात बचतीची आवड निर्माण होऊन त्याचा सकारात्मक उपयोग करण्याचा या चिमुकल्यांंचा उपक्रम वाखाणण्याजोगा आहे .


 
Top