तेर/ प्रतिनिधी-

धाराशिव तालुक्यातील कोळेकरवाडी   येथील   जि.प. प्राथमिक  शाळेच्या विध्यार्थ्यांनी खरी कमाई संकल्पना राबवीत  बाल आनंद मेळाव्यात भाजीपाला व खाद्यपदार्थ  बाजार भरविला.     

  सुमन कोळेकर  ,वच्छला घुटूकडे ,समाबाई कोळेकर ,शीतल कोळेकर ,सविता कोळेकर ,सुषमा कोळेकर, कोमल कोळेकर ,महादेवी कोळेकर  याा महिलांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.या बाजारहाटची संकल्पना मुख्यध्यापिका अर्चना पाटील व सहशिक्षिका शांता सलगर यांनी विषद केली.

इयत्ता पहिली ते चौथी पर्यतंच्या  मुलां मुलीनी यात  सहभाग घेतला होता यावेळी विध्यार्थ्यानी   खाद्यपदार्थ  भाजीपाला विकण्यासाठी ठेवले होते  बाजाराची या माध्यमातून मुलांना बाजारची ओळख व्हावी त्यांना   ज्ञान  मिळावे  या हेतूने बालआंनद मेळावा भरविण्यात आला या  बाजारहाट मधून  मुलांनी आनंद घेतला . अनेक नागरिकांनी विध्यार्थी विध्यार्थिनी कडून  खाद्यपदार्थ भाजीपाला   खरेदी करून आस्वाद घेतला. रविराज कोळेकर अभय कोळेकर,सोहम कोळेकर,रोहित बंडगर,विजय कोळेकर,ओमप्रकाश काळे,समीर कोळेकर,दयानंद कोळेकर व राहूल बंडगर या विध्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला .यावेळी  शाळेच्या  ्मु्ख्यध्यापिका  अर्चना पाटील,सहशिक्षिका शांता सलगर  यांनी परीश्रम घेतले.


 
Top