धाराशिव / प्रतिनिधी-

कळंब कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाची निवडणूक बाळासाहेबांची शिवसेना संपूर्ण ताकदीने लढविणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीत संपूर्ण पॅनल उभे करण्यात येणार असून तालुक्यातील कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे असे आवाहन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी केले.

कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भात जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बैठकीस पक्षाचे विधानसभा संघटक तथा सरपंच अमोल पाटील, उपजिल्हाप्रमुख  आनंद वाघमारे, तालुकाप्रमुख लक्ष्मीकांत हुलजुते, महिला आघाडी जिल्हाप्रमुख भारतीताई गायकवाड, सोनालीताई शिंदे, वर्षाताई परदेशी, शहरप्रमुख गजानन चोंदे, युवासेना तालुकाप्रमुख ईश्वर शिंदे, युवासेना शहरप्रमुख कृष्णा हुर्गट, वैद्यकीय मदत कक्षाचे उपजिल्हाप्रमुख अ‍ॅड. मंदार मुळीक आदींची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाप्रमुख साळुंके म्हणाले की, आगामी काळात नगर परिषद, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना सामोरे जायचे आहे. पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांचे वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य मिळणार असले तरी शिवसैनिक म्हणून आपली जबाबदारी मोठी आहे. म्हणून निवडणुकीत प्रत्येकाने जबाबदारीने काम करावे असे आवाहनही त्यांनी केले. 

बैठकीस हासेगाव (सि.) गावच्या सरपंच प्रियाली रवींद्र गवळी, उपसरपंच अर्चना बालाजी मळगे, बालाजी मळगे, रविकिरण गिरी, किशोर लोहार, कुलदीप कानाडे, मारुती राऊत, सचिन गवळी, नितीन कांबळे, शेषनारायण कानाडे, आवाड शिरपुराचे सरपंच गोविंद आवाड,  सुधाकर महाजन, सुहास बारकुल, पांडुरंग घोगरे, आडसूळवाडीचे सरपंच चंद्रसेन आडसूळ, दिलीप चौधरी, सचिन बारकुल, प्रमोद करवर, विशाल जाधव, आकाश काळे, श्रीमंत साळुंके यांच्यासह तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top