धाराशिव / प्रतिनिधी-

 शहरातील श्रीपतराव भोसले विद्यालयात कोवीड मुळे तीन वर्षानंतर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये विद्यार्थी - शिक्षकांसाठी इ. ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थी - शिक्षकांसाठी क्रीडा सप्ताह २०२ ३ चे आयोजन केले होते. धावणे, लिंबूचमचा, स्लो सायकल , उंच उडी, तीन टांग , चित्रकला निबंध स्पर्धा त्याच बरोबर नृत्य सांस्कृति क कार्यक्रम , आनंद मेळावा सर्व स्पर्धेचे बक्षीस वितरण संस्थेच्या सरचिटणीस   प्रेमाताई सुधीर पाटील यांचे हस्ते मिडल , सन्माचिन्ह , प्रमाणपत्र देऊन बक्षीस पात्र विद्यार्थी शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.

 या प्रसंगी मुख्याध्यापक साहेबराव देशमुख, उपमुख्याध्यापक सिध्देश्वर कोळी, सांस्कृतिक विभाग प्रमुख  तुकाराम शेटे, पर्यवेक्षक वाय के.इंगळे,के. वाय. गायकवाड, धनंजय देशमुख, राजेंद्र जाधव ,प्रा. नंदकुमार नन्नवरे, पर्यवेक्षिका  बी.बी गुंड सर्व इयत्ता निहाय शिक्षक- शिक्षिका , शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .


 
Top