धाराशिव / प्रतिनिधी-

- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एस.एम. मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या मिरवणूक अध्यक्षपदी कृष्णा भोसले यांची तर प्रमुख सचिवपदी काका शिक्रे यांची तसेच प्रमुखपदी गौतम बनसोडे व राज धज निवड करण्यात आली आहे.

 भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यकारिणीची निवड करण्यासाठी माजी नगरसेवक बापू पवार यांच्या अध्यक्षतेखाली तर व्हाईस ऑफ मिडीया उस्मानाबाद तालुकाध्यक्ष अमजद सय्यद व संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक शंकरराव माने यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये उपाध्यक्षपदी सुमित साबळे यांची तर खजिनदार नंदकुमार हावळे यांचा समावेश करण्यात आला.  

  यावेळी नितीन माने, समाधान गवळी, काशिनाथ नमदास, बबलू माने, विशाल पवार,  सुरज ढाके, फैसल मुजावर, जाकीर तांबोळी, सलीम अरब, बाबा माने, राजू माने आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top