धाराशिव / प्रतिनिधी-

काँग्रेसच्या काळात गॅसची दरवाढ २५ रुपये जरी झाली तरी भाजप नेत्या स्मृती ईराणी रस्त्यावर गॅस सिलेंडर घेऊन उभा राहत होत्या व काँग्रेस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत होत्या. आज गॅस सिलेंडरचा भाव चौपट वाढलेला असताना देखील भाजप सरकार व स्मृती ईराणी या भाववाढीकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यांच्या विरोधात आजचे ठेचा भाकरीचे आंदोलन केले आहे, अशी माहिती वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा वाघमारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी या आंदोलनाला शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी भेट दिली. 

सोमवार दि. ६ मार्च रोजी होळीच्या सणा दिवशीच धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला आघाडीने चुली मांडुन चुलीवर ठेंचा व भाकरी तयार केल्या. ठेंचा व भाकरीचे पार्सल प्रधानमंत्री मोदी यांना पार्सलद्वारे पाठविण्यात येणार आहे.,असे सांगून अनुराधा गायकवाड यांनी होळी व महिला दिनानिमित्त विशेष सोयी सवलती जाहीर करने आपेक्षीत होते. परंतू गॅस सिलेंडरची दरवाढ करून मोदी सरकार ने सर्व आर्थिक गणित बिगडवले आहे. मुलांच्या शिक्षणाचा खर्च महागाई वाढ या सर्व प्रकारामुळे आर्थिक विकास कसा करावा, हे समजत नसल्याचे ही गायकवाड यांनी सांगितले. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात वंचित बहुजन आघाडीच्या महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. 

 
Top