तुळजापूर/ प्रतिनिधी-

 जागतिक महिला दिनानिमित्त  तुळजापूर पोलीस स्टेशन तुळजापूर येथे कार्यरत असणाऱ्या  सर्व महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा  सत्कार उद्योजक दत्ता गवळी यांच्या  हस्ते  ठाण्यात फेटे बांधुन बुके देवुन करण्यात आला.

यावेळी री भोलेनाथ लोकरे   यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याप्रसंगी आबासाहेब कापसे यांनी आभार व्यक्त केले या कार्यक्रमात अॅड. नळेगावकर, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद , दीपक थोरात, शंभू देवकर, राजेश गायकवाड, प्रशांत अपराध आदींची उपस्थिती होती.

जवाहर नवोदय विद्यालयात जागतिक महिला दिन निमित्ताने कथाकथन स्पर्धा  जवाहर नवोदय विद्यालयात ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन निमित्ताने  म्हणून साजरा करण्यात आला . प्रारंभी कु मानसी मुरकुटे हिने महिला दिनाचे महत्त्व विशद केले.

 विद्यालयामध्ये कथाकथन स्पर्धा निकाल .पुढीलप्रमाणे  कनिष्ठ गटात प्रथम क्रमांक: तनिष्का मगर, द्वितीय क्रमांक : वेदिका गादेकर, तृतीय क्रमांक: भक्ती भोसले ,तर वरिष्ठ गटामध्ये मानसी मुरकुटे: प्रथम क्रमांक , द्वितीय क्रमांक: अनुराधा भगत, तृतीय क्रमांक :अमरजा ढेपे या मुलीने मिळविला. या मुलींना बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. तसेच विद्यालयातील सदन नायिका यांचाही गुलाब पुष्प व पेन देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी विद्यालयाचे प्राचार्य  गंगाराम सिंह यांनी विद्यालयातील सर्व अध्यापिका यांचा शाल ,गुलाब पुष्प व टिफिन देऊन  सत्कार करण्यात आला.

 याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य गंगाराम सिंह यांनी पौराणिक काळामध्ये देवा वरती देखील  संकट आले होते, त्यावेळी देवीने अवतार घेऊन आलेले संकट निवारण केले .तसेच सध्या घरातील पुरुषावरती आलेले संकट महिला कशा पद्धतीने निवारण करतात हे सांगून आजची महिला आई, बहीण, नणंद ,मावशी, पत्नी म्हणून वेगवेगळ्या भूमिका कशा पार पाडत आहेत हे सांगून संयम व जिद्द यांचे प्रतीक म्हणजे महिला हे सांगितले. देशाचा विकाससाठी महिलांचा सन्मान, चांगल्या प्रकारची वागणूक त्यांचे अधिकार देण्याचे आवाहन सर्व विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन   एच. जी. जाधव यांनी केले .


 
Top