परंडा /प्रतिनिधी - 

राष्ट्रवादी काँग्रेस .सामाजिक न्याय विभागाचे  उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे यांच्या कार्याची वरिष्ठांनी दखल घेऊन  जनतेच्या अडी अडचणी सोडविण्या साठी जिल्हा कार्यालयाच्या जनसंपर्क प्रतिनिधी म्हणून नियूक्ती करण्यात आली आहे.

    परंडा येथिल  माजी नगर सेवक तथा राष्ट्रवादी सामाजीक न्याय विभागाचे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे हे गेल्या अनेक वर्षा पासुन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून तळा गाळातील वंचीत लोकांना शासकीय विविध योजनांचा लाभ मिळऊन देऊन मागास  लोकांचा विकास करण्या साठी कार्य करीत आहेत . त्याच प्रमाणे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष  संघटना वाढीसाठी बनसोडे यांचे कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी राहुल बनसोडे यांची नियुक्ती केली आहे.  बनसोडे यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की आपण पक्षाच्या ध्येय धोरणा नुसार पक्ष संघटनेचे विचार  शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करत आहात, पक्षाचे नेते शरदचंद्रजी पवार  यांच्या

मार्गदर्शनाखाली संबंध जिल्हात छत्रपती शिवाजी महाराज ,फुले-शाहु- डॉ बाबासाहेब आंबेडकर - आण्णाभाऊ साठे यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन पक्षाचा विचार जनमाणसांत पेरण्याचे कार्य करत असल्याने आपली आठवडयाच्या प्रत्येक गुरुवारी कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्या संदर्भात एक दिवस जिल्हा पक्ष कार्यालय येथे बसुन कार्य करण्या साठी नेमणुक करण्यात येत असल्याचे पत्र जिल्हा अध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी दिले आहे.

 या नियुक्तीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे ,माजी आमदार राहुल भैया मोटे ,  जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार , युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा ताई सलगर,, जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर  ,जिल्ह्याचे नेते प्रताप  भैया पाटील  , प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील  ,संजय निंबाळकर ,  महीला आघाडी मराठवाडा अध्यक्ष वैशाली ताई मोटे, तुषार वाघमारे ,  मसूद  शेख , एजाज  शेख , नितीन बागल , सामाजिक न्याय विभागाचे मराठवडा अध्यक्ष प्रा डॉ संजय कांबळे ,उपाध्यक्ष ऍड. इंद्रजित शिंदे, जिल्हा जिल्हा निरीक्षक बालाजी अंकुशराव, प्रदेश सरचिटणीस  अशोक जाधव, जालिंदर कोकणे, महीला आघाडी जिल्हा अध्यक्ष सुनंदा भोसले, अपंग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप डोके, तेजेस भालेराव,  सामाजिक न्याय विभागाचे परांडा तालुका अध्यक्ष विक्रम जाधव, कळब तालुका अध्यक्ष किरणं मस्के, तुळजापूर तालुका अध्यक्ष विनोद जाधव, उमरगा तालुका अध्यक्ष राहुल बनसोडे, उस्मानाबादचे अॅड.राजु कसबे, लोहारा तालुका अध्यक्ष संजय गायकवाड, भूम तालुका अध्यक्ष रविंद्र वाघमारे, वाशीचे रविंद्र  आहिरे, जिल्हा पदाधिकारी नाना पवार,  घनशाम शिंदे,प्रविण कांबळे, साहेब राव अहिरे, गणेश साठे, शाहु इजगज,  धर्मराज कांबळे, रंगनाथ ओहाळ, ज्योती ताई माळाळे , बलासरी पवार, राजाभाऊ जानराव , भाऊराव ओहाळ,  अजय बनसोडे यांच्या सह जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे.


 
Top