उमरगा / प्रतिनिधी-

उमरगा तालुक्यातील कोळसुर तांडा येथे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत 34 लाख रुपयाच्या कामाचा शुभारंभ आज दिनांक 5/3/2023 रोजी जिल्हा परिषदेचे गटनेते प्रकाश आष्टे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.

कोळसुर तांडा येथील ग्रामस्थांना बऱ्याच दिवसापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रकाश आष्टे यांनी कोळसुरसाठी वेगळी व तांड्यासाठी वेगळी योजना मंजूर करून आणली. या योजनेमुळे येथील लोकांचा कायमचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. भूमिपूजन समारंभास  माजी सरपंच किसन राठोड, माजी उपसरपंच कुंडलिक पवार, माजी उपसरपंच शिवराम राठोड, ग्रामपंचायत सदस्य अनिल राठोड, संतोष राठोड, नंदकुमार राठोड, अशोक राठोड,  सोसायटी सदस्य प्रेमनाथ पवार, रायमल राठोड, राजू पवार, वामन पवार, अविनाश पवार, विशाल राठोड, विजय राठोड, सुनील राठोड, सागर राठोड, जीवन पवार, सुभाष राठोड आदी उपस्थित होते.


 
Top