तुळजापूर/ प्रतिनिधी-

तिर्थक्षेञ तुळजापूर येथील घाटशिळ घाटावर असणाऱ्या घाटशिळ मंदीरावर असणाऱ्या शिखरांनवर वृक्ष रोपटे वाढु लागल्यामुळे  शिखराला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने  सदरील वृक्षाचे रोपटे काढुन टाकण्याची मागणी होत आहे.

तिर्थक्षेञ तुळजापूर शहराच्या प्रवेशध्दावर असणाऱ्या घाटशिळ घाटावर मंदीर आहे. या मंदीराचे वैशिष्ट्ये म्हणजे येथे कुठल्याही ही देवदेवतेची मुर्ती नाही तर मोठी शिळ असून यावर प्रभुरामचंद्र थांबले होते अशी आख्यायिका सांगितली जाते.

सध्या येथे मंदीर असुन यावर वृक्ष रोपटे आले असुन ते दिवसेंदिवस वाढत आहेत यामुळे मंदीर शिखराला धोका आहे.तरी हे शिखरावरील वृक्षरोपटे वेळीच काढुन टाकण्याची मागणी होत आहे. 

 
Top