धाराशिव / प्रतिनिधी-

तालुक्यातील ढोकी येथील सौ.स्नेहलता देशमुख कन्या प्रशालेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

 कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सौ. शितल भारत चव्हाण व विमल परमेश्वर घोटकर उपस्थित होत्या. सर्वप्रथम त्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रशालेचे मुख्याध्यापक एस.जी. कळकुंबे यांनी प्रमुख पाहुणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी प्रशालेतील शिक्षक नितीन देशमुख यांनी जागतिक महिला दिनाविषयी माहिती सांगितली.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद गोळे यांनी केले. आभार प्रदर्शन श्री. कोतवाल यांनी केले. याप्रसंगी बालाजी पाळवदे, प्रविण गायकवाड, आबा मुळे, कांबळे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

 
Top